धाराशिव( प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.

प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख पुढे म्हणाले की,छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालेले होते.त्यामुळे त्यांनी शत्रूवर सहजासहजी मात केली.बलदंड शरिरयष्टीचे छत्रपती संभाजी महाराज हे चारित्र्यसंपन्न आणि निर्व्यसनी होते.सध्याच्या काळामध्ये तरुण पिढीने छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करावे. इतिहासातील अनेक नोंदी पाहिल्यास संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्या विशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. असेही ते यावेळी म्हणाले.  सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.  सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top