धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सिद्धिविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी दत्ता कुलकर्णी यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा केली आहे. या निवडीबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. 

दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यापूर्वीही पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांनी या काळात पक्ष संघटनेसाठी जोरदार काम केले होते. त्यांच्या कामाचा पक्षाला मोठा फायदा झाला होता.  केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. दत्ता कुलकर्णी यांनी बँकिंग गुळ पावडर उद्योग, पेट्रोल पंप आदी क्षेत्रात अल्पावधीत गरुडझेप घेतली. कारखान्याला घातलेल्या उसाचा बद्दल शेतकऱ्यांची पेमेंट विषयी कधीही ओरड आली नाही. त्यामुळे शेतकरी हिताचे धोरण राबवल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वत्र आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

त्यांचे व्यवसायिक कौशल्य तसेच समाजकारण, राजकारणातील एकूणच सकारात्मक कार्यपद्धतीचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top