धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा  मार्च 2025 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल 97.56 टक्के लागला आहे. एकूण 82 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या मध्ये 26 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. तर 33 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत. 

प्रज्ञा उमाकांत भागवत ही विद्यार्थिनी 96.80 टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम आली. वैष्णवी लगदिवे हिने 93 टक्के तर श्रेया नामदास हिने 91.40 टक्के गुण घेऊन शाळेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. गौरी शाइवाले हिने 90.40 टक्के गुण घेऊन संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले. 

तेजस्विनी जगदाळे हिने 90 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले. लोकसेवा समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव कमलाकर पाटील, तसेच सदस्य शेषाद्री डांगे, सुषमा पाटील, मुख्याध्यापक डॉ. मनीष देशपांडे आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top