धाराशिव (प्रतिनिधी)- येडशी  येथील श्री संत वै रामकृष्ण भाऊ ,भगवान भाऊ,परमेश्वर महाराज  मंदिर आश्रम व मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा)सस्ते वारकरी सेवा मंडळ संचलित वारकरी शिक्षण संस्था व संगीत विद्यालय येडशी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी सांप्रदायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि 21 मे ते 11 जून 2025 या कालावधीत करण्यात आले आहे.

या शिबिरात 15 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आसुन विद्यार्थ्यांची  गुरकुल पद्धतीने निवासी राहून  प्रशिक्षण देण्याचे व्यवस्थापन ही करण्यात आले आहे.वारकरी सांप्रदाईक भजन गायन, हरीपाठ ,मृदंगवादन, गीतापाठ ,भारूड दिंडी पाऊले तर संगीतातील हार्मोनियम, तबला तसेच सुसंस्कारा बरोबरच संगणक , योग , प्रणायाम यांचे मार्गादर्शन तर सेवा कार्याभाग स्वरूपात स्वावलंबनात्मक धडे आदि प्रकारचे  शिक्षण  दिले जाणार आहे. तरी आत्मसात करू इच्छुकांनी ऐच्छीक विषयानुरूप या शिबीरात सहभाग नोंदवण्यासाठी संपर्क साधुन नोंदणी करण्याचे अवाहान मंदिर संस्थेचे धार्मिक कार्यसेवक  व मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा) सस्ते वारकरी सेवा मंडळाचे सचिव महादेव जालिंदर सस्ते (गुरुजी) संपर्क मो 9420201195 यांनी केले आहे.

 
Top