भूम  (प्रतिनिधी)- भूम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या सेवानिवृत्ती निमित्त धाराशिव येथे धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने गौरी प्रसाद हिरेमठ यांचा सहकुटुंब धाराशिव जिल्ह्याच्या अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस प्रशासनात हिरेमठ यांनी 32 वर्ष सेवा पूर्ण केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विनोद इज्जापवार, पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचे श्रीगणेश कानगुडे, अमोद भुजबळ जिल्हा विशेष शाखा धाराशिव, अर्चना हिरेमठ, आदित्य हिरेमठ, पार्थ हिरेमठ यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 
Top