कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथे दिनांक 10,11  व 12 मे रोजी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटांच्या भव्य कबड्डी स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज तालुका क्रीडा संकुल कळंब येथे सुरूवात झाली असून 

सदर स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते दिनांक 10 मे रोजी संध्याकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार उद्घाटन संपन्न झाले .  याप्रसंगी  शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते अजित पिंगळे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पांडुरंग भवर, डॉ. संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभाऊ कुंभार धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव महादेव साठे, शिवसेना (शिंदे) पक्षाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, डॉ.संदीप तांबारे , ज्येष्ठ खेळाडू बजरंग कोळपे, शिवाजी गीड्डे ,युवक आघाडीचे अध्यक्ष यशवंत दशरथ, राहुल कवडे, शशिकांत निर्फळ ,धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांची उपस्थिती होती. या उद्घाटन प्रसंगी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते अजित पिंगळे यांनी आपल्या भाषणात कळंब शहरात मैदानी खेळाच्या स्पर्धाचे आयोजन  युवक आगाडीच्या वतीने करण्यात येत होते. या खेळास वैभव प्राप्त झाले पाहिजे व त्यासाठी प्रयत्नाची गरज प्रतिपादन केली. तर डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी कळंब  शहरात क्रीडा तसेच आरोग्य व इतर क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्याची गरज प्रतिपादन केली. सदर स्पर्धा या मॅटवर दोन ग्राउंड वर संध्याकाळी 7 ते 11 यावेळी खेळवील्या जात आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक  पटकावणाऱ्या संघास  51 हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघास 31  हजार रुपये व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या  विजेत्या संघास 21  हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक स्वरूपात उत्कृष्ट पकड 2501, उत्कृष्ट चढाई 2501 ,अष्टपैलू 5001, दिवसाचा सामनावीर 2501खेळाडूस बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी राज्यभरातून आतापर्यंत 15 संघांनी  नाव नोंदणी केली आहे. यामध्ये सोलापूर, भोसरी, महासांगवी, धाराशिव, पुणे, या संघाचा समावेश आहे. स्पर्धा 10 ,11 व 12  में तीन दिवस खेळविल्या जात आहे. काल उद्घाटनाचा सामना ग्राउंड क्रमांक 1 वर भैरवनाथ क्रीडा मंडळ भोसरी व स्वराज्य क्रीडा मंडळ यांच्यात व ग्राउंड क्रमांक दोनवर सेवन स्टार धाराशिव विरुद्ध हनुमंत क्रीडा मंडळ महासांगवी यांच्यात लढत झाली. या स्पर्धेतील विजेत्या संघास 12 मे रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहेत. याप्रसंगी डॉ, अभिजीत  लोंढे, रवी उबाळे, मकरंद पाटील ,प्रकाश भडंगे, जगदीश गोरे, अनिल कुलकर्णी, क्रीडा प्रशिक्षक सुबराव कांबळे, साजेद चाऊस,फुलचंद कदम, संग्राम मोहिते, काकासाहेब मुंडे, अनिल शिंदे  हे परिश्रम घेत आहेत.

 
Top