धाराशिव (प्रतिनिधी)-बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाऊ मारूती इटाळकरला लोखंडी रॉड, कोयता व काठीने मारहाण करून खून करण्यात आला होता. त्या मारूती इटाळकरला दहावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये 62 टक्के मार्क मिळाले आहेत. त्याला देशसेवा करण्यासाठी सैन्यदलात जायचे होते. पण आता काय उपयोग असे सांगून मारूतीच्या आई ने डोळ्यात पाणी आणले. मारूतीचा खून करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे. मारूतीचे वडील रिक्षा चालवतात. त्यामुळे मारूती शिक्षण घेत असताना पानाची टपरी चालवून घरात मदत करीत होता. 


 
Top