लोहारा/परंडा (प्रतिनिधी)- परंडा व लोहारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी गुरूवारी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंडा तालुक्यात एका गावात गेल्या 9 महिन्यापासून ते 19 एप्रिलपर्यंत घरी एकटी असताना अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केला. मुलगी 5 महिन्याची गर्भवती राहिली. याबद्दल कोणाला सांगितल्यास तुझ्या आई, वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा तालुक्यातही अत्याचाराची घटना घडली. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस जवळीक साधून तिच्याशी ओळख, प्रेम संबंध निर्माण करून माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत पिडीत अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केले. गुरूवार दि. 22 मे रोजी त्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्नात असताना पीडितेच्या नातेवाईकांनी लोहारा पोलिस ठाण्यात आणले. संबंधित आरोपीविरूध्द पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.