परंडा (प्रतिनिधी)-शहरातील महात्मा फुले चौक येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने प.पु.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रतीमा पुजन माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्यसचिव शिवमती आशाताई मोरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजन करण्यात आले.
यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर शिवमती मोरजकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले रमाई यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व त्यांचे विचार आजच्या पिढीला समजावून सांगितले पाहिजे व सर्व महापुरुषांची जयंती नाचून न करता वाचुन करावी असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, गोवर्धन शिंदे, सुहास पाटील, हारुण बागवान,अनवर शेख, शिवाजी बनसोडे ,मछींदर कांबळे ,नवजीवन चैधरी, राजाभाऊ चव्हाण, महेंद्र सरवदे, दिपक पोळ, प्रमोद पोळ, साहिल बनसोडे, कुणाल बनसोडे, प्रदीप परिहार, आदी महिला व पुरुष मंडळी शालेय विद्यार्थी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत जयंती कमिटीचे सर्वा सर्व तानाजी बनसोडे यांनी यांनी स्वागत केले. व उपस्थितांचे आभार मानले.