धाराशिव  (प्रतिनिधी)- जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या क्रूर आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरीक व पर्यटक यांना धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तर त्या हल्ल्याच्या निषेधाचा ठराव मांडला. तसेच अशा हल्ल्यांना निर्बंध घालावा व अतिरेक्या विरोधात कड़क भूमिका घ्यावी आणि कडक कारवाई करावी असा ठराव दि.25 एप्रिल रोजी पारित करण्यात आला. धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.नितिन लोमटे, सरकारी अभियोक्ता महेंद्र देशमुख,ॲड. रणखांब, ॲड.इंगळे आदींसह विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top