धाराशिव (प्रतिनिधीत्र-  एका निवडणूकीच्या पराभवाने ना उमेद होवू नका, पक्षातून बाहेर गेलेले कावळे सोडून द्या, राहिलेल्या मावळ्यांनी पक्षासाठी एकजुकीने काम करावे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करणाया कार्यकर्त्यांची दखल घेणारा पक्ष आहे. असे सांगून लोकांच्या प्रश्नाबाबत जागरत राहुन शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवाव्या, त्याविरुध्द आवाज उठवावा, येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणूकीसाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी शदचंद्र पवार पक्षाचे मराठवाडा निरीक्षक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

धाराशिव येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक मंगळवारी (दि.1) पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, संजय निंबाळकर, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, संजय निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दुधगावकर यांनी एकवर्षे केलेल्या कामाचा आढावा सांगितला. तर स्वागत प्रकाश मुंदडा यांनी केले. व आभार सुरेश टेकाळे यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मधुकर मोटे,सक्षणाताई सलगर, भालचंद्र बिराजदार, भास्कर शिंदे, तालुकाध्यक्ष नरदेव कदम, हनुमंत पाटुळे, संजय पवार, दिलीप घोलप, ॲड संदीप पाटील, श्रीधर पवार, राम घोगरे, मुसद्दीक काझी, भारत शिंदे, बाळासाहेब कथले, शेखर घोडके, मसुद शेख, सुदन पाटील, विठ्ठल माने, मनिषा राखुंडे, राहुल बनसोडे, प्रकाश मुंदडा, शामराव पाटील, इकबाल पटेल, अनिल जाधव, नामदेव चव्हाण, श्रीहरी नाईकवाडे, रणजित वरपे, मनोहर हारकर, रमेश देशमुख, सुनंदाताई भोसले, नशिरशहा बर्फीवाले, श्री वाघमारे, नंदकुमार शिंदे, महादेव खेरे, ॲड देवकते, नानासाहेब जमदाडे, गणेश गडकर, बाळासाहेब कणसे, किशोर आवाड, बबन काळदाते, राजेंद्र कदम, कमलाकर, सरवदे, खराडे आप्पा, अमर गुंड, औदुंबर धोंगडे, धनंजय भुतेकर, गणेश धाबेकर, राहुल धाबेकर, अक्षय धाबेकर, वामन हगारे, आत्माराम बिक्कड, साहेबराव गोरे, दौलत गाढवे आदी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाची मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top