तुळजापूर (प्रतिनिधी)-  लग्नसराई पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ नवाविवाहीत नवदांम्पत्यांची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचा वावरयाञेतील कुलधर्मकुलाचार करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. देशभरातील सुमारे पाच हजार नवविवाहीत नवदांम्पत्यांनी देविजींचा कुलधर्म कुलाचार करुन आपल्या नव्या संसारी आयुष्यास आरंभ केला.

 नवविवाहीतनवदांम्पत्य आपल्या आईवडील बहीण भाऊजी सह सहकुंटुंब सहपरिवार तिर्थक्षेञ तुळजापूर येथे दाखल  होवुन आपआपल्या पारंपरिक पुजाऱ्यांकडे जावुन देविजींचा वावर याञेचे धार्मिक विधी दहीदुधपंचामृत अभिषेक पुजा, भोगीपुजा, गोंधळ, जावळ, दंडवत यासह अनेक धार्मिक विधी करुन  पुरणावरणाचा नैवेद्य दाखवुन मग पुजा-याचा घरी पुरणपोळीचे भोजन करुन वावर याञा पुर्ण झाल्याचे समाधान मानुन गावी परतत आहे. देविजींचा कुलधर्म कुलाचार होताच थेट बाजार पेठेत जावुन प्रसाद साहित्य फोटो खरेदी करण्यासाठी बाजार पेठेत गर्दी करीत असल्याने नवविवाहीत नवदांम्पत्यांनी बाजार पेठ बहरुन जात आहे. नवविवाहीत नवदांम्पत्य खाजगी वाहनांनी येणे पसंत करीत असल्याने वाहनांनी वाहनतळे भरुन जात असुन महामार्ग रस्त्यावर ही वाहने उभे राहत आहे. हा नवविवाहीत नवदांम्पत्यांचा ओघ असाच लनसराई संपपर्यत असणार आहे.


परराज्यातील नवविवाहीत नवदांम्पत्य वावर याञेसाठी तुळजापूरात ! 

कर्नाटक, आंध्र मध्यप्रदेश, गोवा या राज्यातील नवविवाहीत नवदांम्पत्य वावर यात्रेतील कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येत असुन यात कर्नाटकातील नवविवाहीत नवदांम्पत्यांची संख्या मोठी आहे.


कष्टकऱ्यांपासुन मंञी उद्योगपतीचे नवविवाहीत नवदांम्पत्य वावर यात्रेसाठी देवीदारी !

श्रीतुळजाभवानी मातेची वावर याञा करण्यासाठी कष्टक-यापासुन शेतकरी, आमदार, खासदार, मंत्री, उद्योगपती यांचे नवविवाहीत नवदांम्पत्य वावर याञेसाठी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन वावर याञा करीत आहे. यातुन भक्त कितीही मोठा असला तरी देवीदारी सर्वांना वावर याञेचा एकच विधी आहे.

 
Top