धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच हुबळी येथील नामांकित देशपांडे फौंडेशन या उद्योगसमुहाला भेट दिली. 

 या भेटीमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक नवोपक्रम, स्टार्टअप्स, तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोग व उद्योजकीय वातावरण याचा अनुभव मिळाला. संगणक शास्त्राचा सामाजिक नवोपक्रमात होणारा वापर समजून घेणे.टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्सची कार्यपद्धती समजावून घेणे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सच्या प्रत्यक्ष उदाहरणांचा अनुभव घेणे. उद्योजक व तंत्रज्ञांशी संवाद साधणे.विद्यार्थ्यांनी देशपांडे स्टार्टअप्स या भारतातील सर्वात मोठ्या ग्रामीण टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरला भेट दिली. येथे नवउद्यमांना मार्गदर्शन, आर्थिक मदत व आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा दिली जाते.

विद्यार्थ्यांनी विविध स्टार्टअप संस्थापकांशी थेट संवाद साधला. त्यांनी व्यवसाय संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली.  व   चे प्रत्यक्ष उपयोग, विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सचा समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये कसा वापर होतो हे पाहता आले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पाहिले की कशा प्रकारे संगणक शास्त्राचा वापर आरोग्य, शेती व शिक्षण क्षेत्रात सामाजिक समस्या सोडवण्यासाठी केला जातो.

सामाजिक नवोपक्रमात तंत्रज्ञानाच्या भूमिकेची समज, नवकल्पनांची प्रेरणा व उद्योजकीय दृष्टिकोनाची वृद्धी,  विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि समस्या सोडवण्याची जाणीव, आंतरशाखीय सहकार्याचे महत्त्व लक्षात आले. ही उद्योगभेट विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरली. त्यांनी फक्त तांत्रिक ज्ञानच नाही तर त्याचा समाजोपयोगी वापर कसा करता येईल हे प्रत्यक्ष पाहिले. देशपांडे फाउंडेशनने दिलेली तेरणा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार तंत्रज्ञ होण्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्यामुळे या इंडस्ट्री विजिट मुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट तयार करणे बाबत चुरस निर्माण झाली आहे उपविशात चांगले प्रोजेक्ट करतील व त्या पूजेचे रूपांतर स्टार्ट मध्ये करतील असा विश्वास अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केला आहे.तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. व्ही.व्ही.माने, विभाग प्रमूख प्रा.एस. ए. गायकवाड, प्रा.आर.ए.सरवदे, प्रा .ए. ए. जगताप. श्रीमती जे. डी.मते व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.


 
Top