धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी 9 मार्च रोजी बार्शी मार्गावरील हातलादेवी येथे भेट देऊन पाहणी केली व वनपर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामांबाबत विभागीय वन अधिकारी श्री.पौळ व श्री.करे यांच्याशी चर्चा केली.जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी हातलादेवीचे दर्शन घेतले.
वन पर्यटनाअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पुजार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.तलावात बोटिंग तसेच जल क्रीडा निर्मिती व परिसरात साहसी खेळांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितले. टेकडी परिसरात वृक्ष लागवड करणे, हातलादेवी टेकडीवर जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करणे तसेच विविध प्रकारच्या बांबूंची लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देऊन याबाबतचा प्रस्ताव देखील सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.