मुरूम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली /काटेवाडी येथे दिशा शैक्षणिक व सामाजिक  बहुउद्देशीय संस्था, उमरगा संचलित समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नर्सरी, एलकेजी युकेजी, पहिली ते चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांची मने जिंकली. यावेळी विविध प्रकारचे अभिनव करून विविध गाण्यांवरती नृत्य सादर करताना श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला. 

प्रारंभी वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिपप्रज्वलन उमरगा श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील  यांच्या हस्ते उद्घाटन शुक्रवारी (ता. 27) रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ होते. यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष

प्रा. डॉ. महेश मोटे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई पवार, मुख्याध्यापिका प्रियंका गायकवाड, श्रीमती सत्यभामा गायकवाड, जेष्ठ पत्रकार मारुती कदम, तानाजी मालुसरे यांची तेरावी वंशज कु. कुमकुम मालुसरे, माजी सरपंच रणजीत गायकवाड, उपसरपंच प्रमोद गायकवाड, रमेश बिराजदार, आजरोद्दीन तांबोळी, राहुल थोरात, संतोष कलशेट्टी, धनराज पवार, संस्थेचे सचिव विकास गायकवाड, पत्रकार शरद गायकवाड,  विश्वास सोनकांबळे,  विशाल देशमुख, अमोल कटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.  प्रा. सचिन शिंदे,  विकास (दाजी) सूर्यवंशी, बाळासाहेब माने, माजी सैनिक भानुदास दूधभाते, अप्पू ढगे, रवी लोहार, देवानंद माने, माजी उपसरपंच श्याम घोसले, दिगंबर सूर्यवंशी, विशाल सोमवंशी, संतोष गोस्वामी आदींची उपस्थिती होती. 

प्रास्ताविक उपप्राचार्य रावसाहेब बनसोडे यांनी केले.

प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार  समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक तथा मुख्यप्रवर्तक विकास गायकवाड  यांनी केले. या वेळी प्रमुख अतिथी रेखाताई पवार, प्रा. डॉ. महेश मोटे, भूमिपुत्र वाघ आदींची विशेष मनोगते झाली.  विनायकराव पाटील यांनी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी विशेष विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या स्नेह सम्मेलनात मराठी-हिंदी सह कोळीगीत, लोकगीत, लावणी, भक्ती-भावगीते, भिमगीत, चित्रपटगीत, बालगीत, देशभक्तीपर गाण्यावर आगदी सुंदर नृत्य सादरीकरण करत चिमुकल्यांनी पालकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब बनसोडे तर आभार कु. समृद्धी गायकवाड हिने मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका  सुवर्णा बनसोडे  राणू जाधव, स्वाती राठोड, कु. आकांक्षा गायकवाड शिक्षकेत्तर कर्मचारी रिहाना मकबूल शेख, सोमशंकर स्वामी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील व पंचक्रोशीतून  विविध क्षेत्रातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

 
Top