धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक कार्यालय धाराशिव येथे तंबाखु नियंत्रण कोटपा कायदा 2003 बाबत कार्यशाळेचे आयोजन मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन संजय जाधव पोलीस अधिक्षक, शफकत आमना अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यशाळे साठी पोलीस विभागातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पोलीस प्रमुखांना कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी कोटपा कायद्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे कलम 4 सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी कलम 5 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरात करण्यास बंदी नंतर कलम 6 (अ) 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री व खरेदी करण्यास बंदी कलम 6 (ब) शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य विक्री करण्यास बंदी, याबाबत मार्गदर्शन केले. सदर कोटपा कायद्याची अंमलबजावणी आपापल्या स्तरावर प्रभावीपणे राबवणे बाबत माहीती देण्यात आली. अन्नपूर्णा ढोरे विभागीय व्यवस्थापक मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्याद्वारे कोटपा 2003 कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आणि सदर कार्यशाळेसाठी विशेष सहकार्य पोलीस उपनिरीक्षक कानडे मॅडम यांच्या द्वारे करण्यात आले. यावेळी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.