धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव तर्फे दिनांक 24 व 25 मार्च 2025 या कालावधीत “धाराशिव ग्रंथोत्सव 2024“ संपन्न होणार असून त्यात विविध प्रकाशन संस्था व पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल असणार आहेत, ज्या माध्यमातून भव्य ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्रीची सोय करण्यात येणार आहे. 

त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील साहित्यिकांच्या प्रकाशित ग्रंथासाठीही एक स्वतंत्र स्टॉल असणार आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या साहित्यिकांचे विविध ग्रंथ प्रकाशित झालेले असतील त्यांनी आपले ग्रंथ दिनांक 23/03/2025 पर्यंत सुरेश जोशी (संपर्क 9881449583) आणि समाधान शिकेतोड (संपर्क 9421098130) यांच्याकडे आपली पुस्तके जमा करावीत. जेणेकरून स्थानिक साहित्यिकांच्या प्रकाशित साहित्यासाठीच्या स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येतील. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी केले आहे.


 
Top