तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीचे माजी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, कुलस्वामीनी सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष, शिवछञपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू कै. अशोक रंगनाथ मगर 79 यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कै अशोक मगर हे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमर मगर व युवा नेते रुषी मगर यांचे वडील होते. त्यांच्या वर घाटशिळ स्मशान भूमीत सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील हजारो मंडळी उपस्थितीत होते.