तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार समोर तिर्थक्षेञ तुळजापूर विकास कामे करताना आव्हानांचा डोंगर उभा आहे. हे आव्हान कसे पेलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तुळजापूर विकास आराखडा राबवणे हे नुतन जिल्हाधिकारी पुजार यांच्यासाठी हे आव्हानात्मक असणार आहे.
नुतन जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार हे कर्नाटकातील आहेत. कर्नाटकातील भाविक श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ कोट्यावधीच्या संखेने येतो. श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरात स्वनिधीतुन 58 कोटीचे मंदीर अंतर्गत विकास कामे सुरू आहेत. हे कामे पुर्णत्वास नेण्यास त्यांची कसोटी आहे. कारण यात श्रीतुळजाभवानी मुर्ती व गर्भगृह संरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
ऐकवीशे कोटीचा तुळजापूर विकास आराखडा अंतिम मंजुरी मार्गावर आहे. हे काम पुर्णत्वास नेण्यात त्यांची कसोटी लागणार आहे. श्रीतुळजाभवानी मंदीरात अपेक्षित शिस्त अद्याप लागली नाही. सर्वसामान्य भाविकांना साधे देवीदर्शन घडू दिले जात नाही. व्हिआयपी भाविकांना निवांत दर्शन, फोटो शेशन करु दिले जाते. यामुळे भाविकांना देवीदर्शन घडत नाही. अभिषेक पुजेवेळी भाविकांना दर्शन देताना घडविताना जो भेदभाव होतो तो दूर करणे हे ही आव्हान आहे.
त्या नंतर श्रीतुळजाभवानी मातेच्या धर्मदर्शन रांगेतुन येणाऱ्या भाविकांना सशुल्क दर्शन रांग पुढे असल्याने देवि दर्शन घडण्याऐवजी धर्मदर्शन रांगेतुन येणाऱ्या पेडदर्शन रांगेतील भाविकांच्या पाठीचे दर्शन घडत असल्याने धर्मदर्शन रांगेत तासोनतास थांबणा-या भाविकांना देविचे सहजसुलभ कमी वेळात सर्वसामान्य भाविकांना दर्शन घडवणे हे ही आव्हान असणार आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाढते अतिक्रमणे, बेशिस्त वाहतुक, शहरातील खालावलेली कायदा सुव्यवस्था याकडे ही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.