धाराशिव (प्रतिनिधी)-शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने एमआयडीसी परिसरातील पोलीस सुरक्षा चौकी तसेच एमआयडीसी परिसरातील विविध समस्यांबाबत पोलिस अधीक्षक धाराशिव श्री संजय जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले.

धाराशिव जिल्हा हा मागासलेला असून धाराशिव शहरांमध्ये असलेल्या एमआयडीसीमध्ये अत्यंत तुरळक उद्योगधंदे सुरू आहेत. काही चुकीच्या गोष्टींमुळे हे उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जर हे उद्योगधंदे बंद झाले तर गुंडगिरी व व्यसनाधीनता वाढून समाजाचे स्वास्थ बिघडू शकतो.यामुळेच एमआयडीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेली पोलीस चौकी कार्यरत करणे, या पोलीस चौकी मध्ये 24 तास पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, एमआयडीसी परिसरामध्ये होणाऱ्या चोऱ्या बंद करण्यासाठी गस्त वाढवणे, एमआयऔडीसी परिसरामध्ये होणारे अवैध धंदे बंद करावे, एमआयडीसी मध्ये गुंड प्रवृत्तीचे व्यक्तीकडून होणारे दादागिरी, गुंडगिरी,मद्यपान व अनैतिक कृत्य बंद करावे, एमआयडीसी परिसराचा व्यसन नशा करण्यासाठी वापर बंद करावा, एमआयडीसी परिसरामध्ये असणाऱ्या उद्योगधंद्यांना समाजविघातक प्रवृत्ती कडून होणाऱ्या गुंडगिरीचा बंदोबस्त करावा यासह अनेक मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना देण्यात आले. 

यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे अध्यक्ष श्री गौरव बागल , श्री धर्मराज सूर्यवंशी ,श्री संतोष घोरपडे ,श्री हनुमंत तांबे ,श्री शुभम लोकरे ,श्री योगेश आतकरे श्री दत्तात्रेय साळुंके , श्री ऋषिकेश काळे ,श्री भैरवनाथ रणखांब ,श्री अमोल साळुंके यांचे सह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन स्वीकारून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी कामाची पूर्णता करण्याबाबत स्वतः जातीने लक्ष घालण्याची आश्वासन दिले आहे. 

 
Top