धाराशिव (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने जुन्या कायद्याच्या कलमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी  माहिती दि.5 फेब्रुवारी रोजी देण्यात आली.

केंद्र सरकारने कायदे व कलमामध्ये अनेक अमुलाग्र बदल केलेले आहेत. त्या कायद्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी 100 दिवसांचा जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार घाटंग्री येथील श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता 10 वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांना नवीन भारतीय न्याय संहिता कायद्याबाबत ऍड. विमल एस. म्हैत्रे, सहाय्यक न्याय रक्षक ऍड एम.एस. शिरुरे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय यु.एम. हाके, महिला पोलीस एम.पी. लोखंडे, पोलीस अंमलदार गणेश ए. खैरे यांनी नवीन भारतीय न्याय संहिता कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.पी. माने, शिक्षक एस जी इंगळे, बी आर जाधव, एस के पाटील, एम व्ही आमलपुरे, एम आर मुलाणी एम, एस पी पवार, ए बी शेजाळ, अमोघे, एम जी राठोड, सी एस चामे,  ए.एस. कुलकर्णी, जे.व्ही. घेरडी, वाय पी मंडलीक, एस एम शिनगारे, शिक्षकेत्तर कर्मचारी डी जी कांबळे, तेजस माळी, गेंड, बी बी कांबळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top