धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये महाराष्ट्र ज्ञान मंडळ  गेल्या 22 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून  महाराष्ट्र ज्ञान मंडळाद्वारे इ. 5 वी ते इ. 9 वी च्या शालेय  विद्यार्थ्यांसाठी  01 नोव्हेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत ‘MKCL ‌‘ ऑलिम्पियाड मूव्हमेंट  2024 '  स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या प्रशालेतील महाराष्ट्र ज्ञान मंडळ मान्यता प्राप्त अण्णा इन्फोटेक  या अधिकृत प्रशिक्षण केंद्रातून इयत्ता 5 वी ते 9 वी मधून एकूण 806 विद्यार्थयांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धा परीक्षेमध्ये  पुढील विद्यार्थ्यांनी आपापल्या इयत्तेमधून जिल्हास्तरावर क्रमांक पटकावला.

इयत्ता 5 वी-  पाटील रितेश अरविंद (172 पैकी 125 गुण मिळवून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक. बक्षीस : रु. 3000 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.),  निकम आयुष कुमार (172 पैकी 117 गुण मिळवून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक. बक्षीस : रु. 2500 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.)

इयत्ता 6 वी-  आरगडे आर्या अमोल (172 पैकी 153 गुण मिळवून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक. बक्षीस : रु. 2500 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.). इयत्ता 7 वी - चव्हाण आदित्य धनंजय (188 पैकी 154 गुण मिळवून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक. बक्षीस : रु. 3000 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.), लोखंडे ऋतुराज भाऊसाहेब (188 पैकी 151 गुण मिळवून जिल्हास्तरावर त्रितीय क्रमांक. बक्षीस : रु. 2000 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.), इयत्ता 8 वी -  गरड समर्थ विकास  (256 पैकी 219 गुण मिळवून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक. बक्षीस : रु. 3000 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.), गोरे अक्षदा आशिष (256 पैकी 211 गुण मिळवून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक. बक्षीस : रु. 2500 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.), पठाण सोहा आरिफ  (256 पैकी 203 गुण मिळवून जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक. बक्षीस : रु. 2000 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.), इयत्ता 9 वी- डोंगरे समीक्षा सचिन (272 पैकी 247 गुण मिळवून जिल्हास्तरावर तृतीय  क्रमांक.  बक्षीस : रु. 2000 किमतीचे सायन्स-रोबोटिक कीट.).

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे धाराशिव जिल्हा संघटक सुधीर पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अण्णा इन्फोटेकचे चेअरमन आदित्य  पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याद्यापक प्रमोद कदम, तसेच पर्यवेक्षक धनंजय देशमुख, निखीलकुमार गोरे, राजेंद्र जाधव, सुनील कोरडे, वाय. के. इंगळे, बी.बी. गुंड व प्रा. विनोद आंबेवाडीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ तसेच सायन्स रोबोटिक कीट देऊन सत्कार करण्यात आला.


 
Top