धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग - अक्कलकोट मार्गाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तात्काळ भूसंपादनाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दि.10 फेब्रुवारी रोजी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग - अक्कलकोट मार्गाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दि.7 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग अक्कलकोट या मार्गाच्या सुरू केलेल्या कामाबाबत संबंधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला. हीबाब या बैठकीत प्रकर्षाने मांडली. यावेळी ऍड राम शिंदे यांनी ऑनलाईन शेतकऱ्यांची खंबीरपणे बाजू मांडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव संतोष राऊत, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी राजगुरू आणि हबीब शेख, भूमी अभिलेखचे कुलकर्णी, तुळजापूरचे तहसिलदार अरविंद बोळंगे, भूमी अभिलेखचे प्रभारी उप अधीक्षक प्रभारी मोरे, आकाश राऊत, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांच्यासह ऍड संतोष कुलकर्णी, शेतकरी प्रतिनिधी दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, राम निकम, बंडू मोरे, पिरपाशा इनामदार, संजय व्हंताळे, राजेंद्र पाटील, महेश घोडके, दयानंद बाबर, पंडित निकम, तुळशीराम शंकरन, अनिता जनार्दन राणे, बालाजी ठाकूर, काशिनाथ काळे, श्रीमंत फडतरे, प्रताप ठाकूर, मल्हारी बनशेरे, नरसिंग निकम, महालू हलकंबे, शिवराम निकम, अजमुद्दीन शेख, दिगंबर घोडके, तोलू करीम शेख, दत्ता दिलीप निकम, खंडू हलकंबे, मच्छिंद्र बनशेरे, नेताजी खंडू पाटील, सिद्रामाप्पा बिराजदार, दिलीप पाटील, रहमान शेख, गुलाब शिंदे, दशरथसिंग ठाकूर, राजेंद्रसिंग ठाकूर, विजयसिंग ठाकूर, शरणाप्पा कबाडे, महादेव बिराजदार, मुन्ना जागीरदार, श्रीकांत पोद्दार आदींसह शेतकरी या बैठकीसाठी उपस्थित होते.