धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील श्री सिध्दीविनायक परिवार ही विविध क्षेत्रांत विश्वासार्ह सेवा देणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात सध्या दोन ऊस कारखाने अत्यंत यशस्वी आणि सुव्यवस्थित पद्धतीने कार्यरत आहेत. आज, 2024-25 च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या हंगामात कारखान्याने एकूण 1 लाख 57 हजार मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप केले. शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहण्याच्या वचनानुसार, जानेवारी महिन्यापर्यंतच्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. श्री सिध्दीविनायक परिवार शेतकरी हितासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असून, भविष्यातील हंगाम अधिक सुव्यवस्थित आणि शेतकरी हितकारी करण्यासाठी कटिबद्ध आहे.
सदरील कार्यक्रमास व्यंकटेश कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, धनंजय गुंड, मंगेश कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, बालाजी जमाले, अभयसिंह शिंदे, प्रदीप धोंगडे तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, उस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, वाहन मालक उपस्थित होते.