धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक महादेव लाव्हरे पाटील यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या मातोश्री सोजरबाई महादेव लाव्हरे पाटील आणि चिरंजीव मल्हार दीपक लाव्हरेपाटील उपस्थित होते.
दीपक लाव्हरे पाटील हे धाराशिव शहरातील माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्त लागण्यासाठी ते कठोर परिश्रम घेत आहेत. यामुळे रोड रोमिओंची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. एवढेच नाही तर कर्तव्यावर असताना देखील विविध शाळा व महाविद्यालयातील खेळाडूंना मार्गदर्शन करणे , पोलीस भरती व सैन्यामध्ये भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मैदानावर योग्य मार्गदर्शन करण्याचे काम दीपक लाव्हरेपाटील करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाविद्यालयाने त्यांना सन्मानपत्र देऊन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रोफेसर डॉ. वाल्मीक सरवदे , विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ.अंकुश कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते लाव्हरेपाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.