तुळजापूर (प्रतिनिधी)- मानवतेचे प्रचारक थोर संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी चर्मकार समाजाच्या वतीने भवानी रोडवर संत श्री रोहिदास महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, शिवसेनेचे श्याम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मिलिंद रोकडे, शहाजी वाघमारे, संजय गायकवाड सह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्रीसंत रोहीदास जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या अन्नदान उपक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.