तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील  शांतीसागर प्राथमिक विद्यामंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दीपक कदम हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव'   प्रतिभा शेंबेकर चिवरी चे सरपंच लक्ष्मण मेंढापुरे दैनिक  एकमत चे पत्रकार सचिन ढेले  हे होते सुरुवातीला आई तुळजाभवानी मातेचे  प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उदघाटन   करण्यात आले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ राजमाने यांनी प्रास्ताविक  करून शाळेच्या गुणवत्ता व विविध उपक्रम राबवत  असल्याबाबत ची माहिती सांगितले व विद्यार्थ्यांनी कलागुणाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी उच्च शिक्षण घेऊन आपले नाव कमवावे असे सांगितले वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमात एकूण 30 ते 35 गाणे नृत्य देशभक्तीपर गीते आधीचा चा समावेश होता प्रत्येक गीताला प्रेक्षकांमधून भरपूर प्रतिसाद मिळाला व आभार सुधाकर फासे यांनी आभार मानले पालक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top