धाराशिव (प्रतिनिधी) - शिवशंकर ईराप्पा कोळी यांनी त्यांच्या मुलाचे अवयव दान केले होते. अवयव दान म्हणजे एक प्रकारे नवजीवनच आहे. हे अतिशय अनमोल कार्य कोळी यांनी केल्याबद्दल मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त छावा संघटनेच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव दि.५ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.
औसा तालुक्यातील टेंभी येथील मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधीस्थळी नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, औसा तालुका अध्यक्ष बाजीराव एकुरगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.