धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षी विविध ठिकाणी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा सर्वांनाच परिचित असून यामध्ये उत्साहाने सर्वजण सहभागी होत असतात. परंतु यंदा प्रथमच धाराशिव मध्ये महिलांसाठी साडी वॉकॅथॉन होणार असून जवळपास 1000 महिला यामध्ये रजिस्ट्रेशन करून सहभागी झालेल्या आहेत.
यावेळी बोलताना वॉकॅथॉन च्या मुख्य प्रवर्तक किरण देशमाने म्हणाल्या की, धाराशिवमध्ये आम्ही प्रथमच हा प्रयोग करत आहोत , कारण सध्याच्या धावपळीच्या युगात महिलांनी रोज सकाळी चालणे ,फिरणे ,व्यायाम करणे आरोग्यदायी असून प्रत्येकीची सकाळी अगदी फ्रेश सुरू व्हावी हाही या पाठीमागील उद्देश आहे. महिलांचा यासाठी उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे आमचा ही उत्साह वाढलेला आहे.अपेक्षेपेक्षा जास्त 1000 रजिस्ट्रेशन संख्या पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन बंद करावे लागले. कारण हा उपक्रम सुरळीत व्हावा हाच या पाठीमागील उद्देश होता.
रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता साडी वॉकॅथॉन चे उद्घाटन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3132 डॉ.सुरेश साबु, तसेच पहिल्या विश्वविजेत्या खोखो संघाच्या विजेत्या अश्विनी शिंदे, जिल्हा मुख्य न्यायाधीश तृप्ती मिटकरी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या डिन डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.