तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील अणदुर येथील सर्वे नंबर 155 मधील मेनरोड वरील अतिक्रमण काढण्याचा मागणीसाठी बाळकृष्ण पाटील यांनी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि,, मौजे अणदुर येथील सर्वे नंबर 155 गायराण मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण झाले असून, रस्ता अरूंद झाला आहे. अणदूर बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्वे नंबर 155 गायराणची जमिन असून काही दुकानदार यांनी दुकानाकरीता अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण केलेल्या ठिकाणी नॅशनल हायवेपासून खंडोबा मंदिर, खुदावाडी, गुजनूर, शहापूर व अक्कलकोट हा मुख्य रस्ता आहे. सध्या या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी तिर्थक्षेत्र पर्यटन विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतू त्याच ठिकाणाहून नविन पाणी पुरवठा योजनेचे काम पण सुरु असून, सध्या पाणी पुरवठ्याचे काम बंद ठेऊन रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ता झाल्यानंतर परत रस्त्याचे खोदकाम करून पाणी पुरवठ्याचे काम घेतल्यानंतर कोट्यावधी रुपयाचा निधी वाया जाणार असले बाबतचे अनुषंगाने तक्रार दाखल केली होती. त्याची दखल न घेतल्याने सोमवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.