तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील कोरेवाडी येथे आयोजित हळदी कुंकु कार्यक्रमास महिला मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद धाराशिवच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी रात्री उशीर होऊही फार मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महिलांचा व ग्रामस्थांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. अर्चनाताईं यांनी महिलांना हळदी-कुंकु-संक्रांतीचे वाण देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी सरपंच सुरेखाताई सलगर, आशीर्वाद उमेद महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मंजुश्रीताई गोविंद हुलवानकर, स्वातीताई सरडे, संजिवनीताई शिंदे याही उपस्थित होत्या. तसेच तेरणा युथ फाऊंडेशनचे तालुका उपाध्यक्ष सयाजी शिंदे व सरडेवाडीचे युवा नेतृत्व आबा सरडे हेही उपस्थित होते. अर्चनाताई पाटील यांनी उपस्थित महिलांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली.केंद्र व राज्य शासनाच्या PMEGP व CMEGP या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग -व्यवसाय उभा करुन महिलांना सक्षम होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गावाच्या विविध समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांना अश्वास्त केले. गावाच्या विकास कामांसाठी विविध योजनेतून विकास निधी उपलब्ध करून देऊन गावच्या विकासासाठी आवश्यक पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद हुलवानकर यांनी केले. कोंडीबा देवकर यांनी आभार प्रदर्शन केले. तर प्रा. भैरवनाथ कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याण पाटील, आबा सरडे ,गावचे पोलीस पाटील अण्णासाहेब पाटील व युवक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.