धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार भवन धाराशिव येथे भारतीय प्रजासत्ताक अमृत महोत्सवानिमित्त पाच शहीद कुटुंबियांच्या सत्काराचे आयोजन दि. 26/01/2025 कामगार कल्याण भवन धाराशिव येथे करण्यात आले. शहीद शिपाई भगवानराव किसनराव महाडीक यांची वीर पत्नी श्रीमती रतनबाई भगवान महाडीक, शहीद शिपाई राजाराम आबा निकम यांची वीर पत्नी प्रभावती राजाराम निकम, शहीद शिपाई पंडीत हिराजी जाधव यांचा मुलगा श्री विजयसिंह पंडीत जाधव, शहीद नाईक पवार वामन मोहन यांची वीर पत्नी वौशाली वामन पवार, शहीद गनर नागरगोजे महादेव गोरख यांचा वीर भाऊ अंगद गोरख नागरगोजे या पाच शहीद कुटुंबियाचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, संविधान प्रत, पुष्पगुच्छ देवून यथोचितरित्या प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष काशीनाथ मारुती दिवटे हे होते. प्रमुख पाहूणे शाहूराज कावरे, विशेष अतिथी कुलदिप सावंत, विशेष उपस्थिती गुणवंत कामगार वासुदेव वेदपाठक, अच्युत माने, सोमेश्वर पाळणे, विजय गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, राजाभाऊ आंधळे, महादेव घोळवे, विशाल थोरात, मन्मथअप्पा पाळणे इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमांचे प्रास्ताविक एस.के. काशिद केंद्र संचालक यांनी केले. कार्यक्रमाचे आधार मनिषा भडंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख आयाज, जगदाळे रमेश, दिलीपराव कुज्हाडे, विकास चौगुले यांनी विशेष परिश्रम केले.