भूम (प्रतिनिधी)- परांडा भूम वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आपल्या इराचीवाडी गावभेट दौऱ्या दरम्यान शेतकरी आणि इराचीवाडी, मात्रेवाडी ग्रामस्थ यांच्यासह पूर्ण इराचीवाडी साठवण तलावाची पाहणी केली. 

हा इराचीवाडी साठवण तलाव राहुल मोटे यांच्या कार्यकाळात व राहुल मोटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता.  70% काम सुद्धा 2019 पूर्वीच झाले होते. वास्तविक पाहता मागील 5 वर्षात हे काम पूर्ण होऊन मतदारसंघातील इतर साठवण तलावसारखा या तलावाचा  शेतकऱ्यांना फायदा चालू होणे गरजेचे होते. परंतु मागील 5 वर्षात या कामाचा कसलाही पाठपुरावा न झाल्याने हा तलाव तसाच अपूर्ण राहिला.. 

आज या तलावाच्या भेटीदरम्यान राहुल मोटे यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या साठवण तलावासाठी संपादित केल्या होत्या त्याचा योग्य मावेजा त्या त्या संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी इराचीवाडी, मात्रेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माजी आमदार राहुल मोटे हे थोडक्या मताने पराभूत होऊ देखील मतदार संघातील जनतेत फिरून जनतेच्या अडचणी सोडवीत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

 
Top