नळदुर्ग (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यात रिन्यूव या पवनचक्की कंपनीने घातलेल्या धुमाकुळीमुळे शेतकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. दलालाच्या मार्फत कंपनीकडून मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणुक केली जात असून शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रीरीची ना जिल्हाधिकारी दखल घेत आहेत ना पोलिस प्रशासन दखल घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता वालीच उरला नाही अशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

सध्या गेल्या एक दीड वर्षापासून तुळजापूर तालुक्यात रिन्युव पवनचक्की कंपनीने आपले पाय पसरले आहे, शेतकऱ्यांच्या जमीनी दलाला मार्फत खरेदी करुन घेवून त्या ठिकाणी पवनचक्की उभी करायची असा सपाटा सध्या या कंपनीकडून चालु आहे. कंपनीला एखादी जमीन पसंद पडली की, ती जमीन दलाला मार्फत शेतकऱ्यांची विक्री करण्याची मानसिकता नसताना ही साम दाम दंड वापरुन शेतकऱ्यांवर दबाव टाकून शेतकऱ्यांची जमीन खरेदी करुन घ्यायची आणि त्या जमीनीवर आपली पवनचक्की उभी करायची असाच प्रकार सध्या तुळजापूर तालुक्यात चालू आसल्याची चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे. त्यामुळे अनेक वेळा त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाला म्हणजे जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस प्रशासन यांना तक्रार दाखल करुन ही या तक्रारीची दखल कोणी ही घेत नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्याच बरोबर पोलिस प्रशासनाकडे ही तक्रार दाखल केली आहे मात्र. या ठिकाणी कोणीही शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.त्याच बरोबर तालुक्याचे लोकप्रतिनिधी ही या बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा ही सध्या शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान तुळजापूर तालुक्यात कार्ला, सलगरा दिवटी, गंधोरा, मानेवाडी, बसवंतवाडी, आरळी, वाणेगाव, किलज, होर्टी, मुर्टा, जळकोट, जळकोटवाडी, मानमोडी, वडाचा तांडा, मेसाई जवळगा, हंगरगा तुळ, बारुळ, तीर्थ बु. तीर्थ खु. देवसिंगा तुळ, अलियाबाद आदी गावाच्या शिवारामध्ये मोठया प्रमाणात या कंपन्यांनी आपला तळ ठोकला आहे. 


 
Top