धाराशिव - भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आणि भारतीय संविधान स्विकृतीला ७५ वर्ष पुर्ण झाल्या बद्दल शहरातुन संविधान रॅली काढण्यात आली.संविधानाचा गौरव म्हणुन दरवर्षी मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण रॅली काढण्यात येते. या रॅलीत व्यापारी महासंघा तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, सचिव अब्दुल लतिफ, कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, रौफ शेख, अमर आगळे, युसुफ सय्यद यांच्या हस्ते व्यापारी महासंघाचे लक्ष्मीकांत जाधव संजय मंत्री आयुब पठाण राधेश्याम बजाज यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत देऊन सत्कार करण्यात आला. रॅलीत जिल्हा सेवा प्राधिकरणचे पदाधिकारी व जाॅन मलेलु चर्चच्या वतीने ख्रिश्चन बांधव भगिनी सामिल झाले होते. समितीच्या वतीने बाबासाहेब गुळीग,सचिन चौधरी यांनी आभार मानले.