धाराशिव (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर उपप्राचार्य पदी विक्रमसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राचार्य बाळासाहेब मुंडे हे प्रशालेचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू होत. ते गेली 31 वर्ष गणित विषयाचे अध्यापन करत आहेत. तर उपप्राचार्य विक्रमसिंह देशमुख हे संस्कृत विषयाचे तज्ञ शिक्षक आहेत. सदर नियुक्ती बाबत राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे, उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, सदस्य सेवानिवृत न्यायाधिश संभाजी मुंडे, पंडितराव चेडे ,श्रीमती निर्मलाताई भांगे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.