भूम (प्रतिनिधी)-भारतीय राजकारणातील शिखर पुरुष, लोकनायक, विलक्षण नेतृत्व, दूरदर्शी, अमोघ वक्ते, अजातशत्रू, माजी पंतप्रधान, प्रेरणास्त्रोत, भारतरत्न, श्रद्धेय स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांना जयंतीनिमित्त भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे अभिवादन केले..
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भालचंद्र औसरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, शिवाजी पाटील, परसराम कोळी, अजित काकडे, गजानन तिवारी, अमर ठाकूर, गौरव पाटील, सिध्दीक हन्नूरे, धनंजय काळे, तुषार कोळेकर, शुभम भातलवंडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.