तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शाषणाने महिलांना एस. टी. दरात सवलत दिल्याने महिला प्रवासी संखेत प्रचंड वाढ झाली आहे. अलीकडे बसस्थानकात

महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चोरट्यांनी आपले लक्ष बसस्थानक केले असुन सध्या येथील बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांचे सोने दागदागिने, पर्स मधील रोख रक्कम चोऱ्यां प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. एसटी दरात सवलत मुळे लग्नसराई, देवदर्शन याकरता महिला एस.टी. बसने ये-जा करतात. हेच शोधून चोरट्यांनी महिलांचे दाग दागिने चोरण्याच्या दृष्टीने आपले लक्ष आता बस स्थानकावर वळवले आहे.

सध्या सर्वत्र लग्न सराईचा सीजन आहे. त्यामुळे महिला सोने दागदागिने घालुन या लग्न सोहळ्यात सहभागी होतात. याचाच लाभ चोरटे महिला बसमध्ये चढताना गळ्यातील, पर्स मधील दागदागिने महिलांचे लक्ष इतरञ जाताच अलगद नकळत लंपास करीत आहेत. येथे पाच हजार पासुन बारा लाखांपर्यत सोने दागदागिने चोरण्याच्या घटना घडल्या आहेत.

या साऱ्या पार्श्वभूमीवर लग्नाला जाण्यासाठी नातेवाईक, मित्र मंडळी यांना येण्या-जाण्यासाठी लालपरी हे सोयीस्कर ठरते. त्यामुळे वऱ्हाड आणि वधू-वराकडील मंडळी लालपरीतून ये-जा करण्याकरिता बसस्थानकात गर्दी करतात. हेच हेरून दागदागिने चोरट्यांनी बसस्थानकांकडे आपला मोर्चा वळविला. बसस्थानकामध्ये गर्दी दिवशी म्हणजे मंगळवार, शुक्रवार, रविवार, पोर्णिमा या दिनी महिलांचे दागदागिने चोऱ्यांचे प्रमाण वाढले. येथे महिलांचे दागिने चोरण्याची चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. सध्या बाहेरगावच्या चोऱ्यांचा टोळ्या सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिस खात्याची गुप्तचर यंञणा अपयशी ठरल्याने याचा फटका महिलांना दागिने  चोऱ्या होवुन बसत आहे. या चोऱ्यांचा तपास लागतो कि नाही या बाबतीत काहीच माहीती बाहेर येत नसल्याने यात चोरट्यांचे फावत आहेत.

पोलीसांनी सराईत चोरट्यांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.नागरिकांनी बसमध्ये चढताना उतरताना वा बसस्थानकात बसलेले असताना कोणी धक्काबुक्की करत असेल तर त्याच जागेवरच हटकले पाहिजे. बस स्थानकात महिलांची मोठी गर्दी असते. याचाच फायदा हे चोरटे घेत असतात. सध्या लग्नसराई आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बस स्थानकात पोलिसांची संख्या वाढवून पेट्रोलिंग करणे गरजेचे असुन  रेकॉर्डवरील  चोरट्या  गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचाही प्रतिबंध करणे गरजेचे आहे. अन्यथा महिला दागदागिने चोऱ्या वाढत जाण्याची शक्यता आहे.

 
Top