तुळजापूर (प्रतिनिधी)- सोयाबीन शासकिय हमीभाव खरेदी केंद्र  आँनलाइन नोदणी साठी 31 डिसेंबर 2024 पर्यत मुदत वाढ देण्यात आल्याची माहीती खरेदी विक्री संघ चेअरमन सुनिल जाधव यांनी दिली. 

या बाबतीत अधिक माहीती अशी की, शासनानेे  हंगाम 2024-25 मधील हमीभावाने खरेदी प्रक्रीयेतील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रीयेबाबत शासन समक्रमांकित दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजीचे  पत्रान्वये हंगाम 2024 - 25 मधील हमीभावाने सोयाबीन, मूग व उडिद खरेदी प्रक्रीयेतील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रीयेसाठी दिनांक 15 डिसेंबर, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदत दिनांक 31 डिसेंबर, 2024 पर्यंत वाढविण्यात येत आहे. याची  संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती संगिता दि.शेळके अवर सचिव, महाराष्ट्र शासन  यांनी दिली आहे. सध्या सोयाबीनचा बाजार भाव 4100 रुपये आहे. तर शासकीय हमीभाव खरेदी 4892 रुपये आहे.

 
Top