भूम (प्रतिनिधी) -आज नांदेड येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत 17 वर्ष वयोगटात श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूमचा जिगरबाज क्रीडापटू उगलमूगले श्रेयस ह्याने गोळा फेक मध्ये विभागात प्रथम क्रमांक मिळविला. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. त्याला दमदार क्रीडा प्रशिक्षक आप्पा मिसाळ व जयंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल या तिघांचेही श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर भूम च्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने अभिनंदन केले.


 
Top