धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 8 ते 10 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी चार खेळाडूची निवड झाली. शेगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर स्पर्धेत धाराशिवच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक तर मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. यामध्ये धाराशिवच्या मुलांच्या संघातून एक व मुलींच्या संघातून तीन अशा चार खेळाडूंची निवड करण्यात आली.
मुलांच्या संघात आर्यन झाडके तर मुलींमध्ये संचिता यादव, सिद्धी अभंग, संस्कृती गव्हार या खेळाडूंची निवड झाली असून हे खेळाडू दिनांक 7 तारखेला राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाले. त्यांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजकुमार सोमवंशी, सचिव तथा राज्य संघटनेचे सहसचिव शरद पवार, सल्लागार संजय घुले, सर्व पदाधिकारी, नूतन क्रीडा अधिकारी तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शितल शिंदे, गंगासागर शिंदे, मार्गदर्शक अनिल शिंदे ,राजाभाऊ शिंदे, शिल्पा डोंगरे,बाळकृष्ण भवर, संजय लोखंडे उत्तरेश्वर गायकवाड, परमेश्वर मोरे या सर्वांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.