तेर (प्रतिनिधी)- सोलापूर कळंब बसला अपघात झाला असून, बसमधील सर्वं प्रवाशी सुखरूप आहेत.ही घटना तेर जवळील तेरणा धरणाजवळ 31 आक्टोबरला सकाळी घडली.
याची सविस्तर माहिती अशी की, कळंब बस आगाराची एमएच 14 बीटी 1639 सोलापूर कळंब ही बस 31 आक्टोबरला सकाळी साडे अकराच्या दरम्यान तेरहूंन कळंबकडे जात असताना तेरणा धरणाच्या समोरील पुलावर आल्यावर पुलाच्या डावीकडील कठड्यावर जाऊन आदळली.सुदैवाने या बसमधील सर्वं प्रवाशी सुखरूप बालंबाल वाचले.