धाराशिव (प्रतिनिधी)-  युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात 8 नोव्हेंबर रोजी येणार असून, त्यांची धाराशिव येथे दुपारी जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दि. 6 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस धाराशिव- कळंब मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे, शिवसेना शिंदे गटाचे सुरज साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र धुरगुडे, भाजपाचे संताजी चालुक्य, नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, इंद्रजित देवकते, संपत डोके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात धाराशिव जिल्ह्यात मोठे विकास काम झाले आहे. गेम चेंजर प्रकल्प मार्गी लागले आहेत. कौडगाव औद्योगिक वसाहत, 50 मेगावॅट सोलर प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाईल पार्क यामुळे 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.  रिलाईन्स ग्रॅस पाईपलाईन, उजनीवरून येणार पाईपलाईन, हायहोल्टेज लाईन या तिन्ही लाईन कौडगाव औद्योगिक वसाहतीमधून जात आहेत. त्यामुळे बाहेरचे उद्योजक येथे येण्यास तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे उद्योकासाठी ज्या सवलती आहेत त्याचा लाभ घेण्यास अनेक उद्योजक इच्छुक आहेत. या सर्वामुळे येणाऱ्या काही वर्षात दरडोई उत्पन्न वाढणार आहे. 


 
Top