धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रूपामाता नॅचरल शुगर युनिट क्र.१ च्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख सुधीर अण्णा पाटील, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड( गुरुजी), ह.भ.प. पांडुरंग महाराज लोमटे,ह.भ.प.परमेश्वर महाराज शिंदे, घुगी येथील प्रगतिशील शेतकरी गव्हाड आबा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन करताना अँड. गुंड म्हणाले की, रूपामाता शुगर मुळे धाराशिव तुळजापूरसह लातूर तालुक्यातील औसा व लातूर ग्रामीण या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढले असून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक बदलास मदत झाली आहे. हंगाम 2024-25 मध्ये कारखान्याच्या शेतकी विभागाने परिसरातील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे चिफ जनरल मॅनेजर सुर्यकांत गरड, मुख्य शेतकी अधिकारी प्रेमनाथ पाटील, सर्व विभाग प्रमुख, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र कापसे, कारखान्यातील विभाग प्रमुख, वाहतूक ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.