धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खा सुनील तटकरे यांची मुंबई येथे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी धाराशिव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम समाधानकारक असल्याची चर्चा केली. यामध्ये धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघासाठी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी ना. पवार यांना सविस्तरपणे सांगितले. तसेच लोकसभा व विधानसभेच्या मतदानाची परिस्थिती वेगळी असून महाविकास आघाडीच्या विरोधात जनमत कसे तयार झाले आहे ? हे देखील त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावर असून तो महायुतीसोबत असल्याचे देखील मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीचा जो उमेदवार असेल तो निश्चितपणे निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार सांगितले. विशेष म्हणजे धाराशिव शहर हे राष्ट्रवादीचे माहेरघर असून महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा कसा होणार ? हे लाडकी बहीण योजना, गॅस अनुदान यासह इतर योजना फायदेशीर ठरले असून त्याचा कसा फायदा होईल हे ना पवार व खा तटकरे यांना पटवून दिले. ही जागी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणालाही निश्चित झालेले नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ती राष्ट्रवादी काँग्रेसलाच कशी मिळेल ? यासाठी आपण प्रयत्न करून ती मिळवावी अशी मागणी त्यांनी केली.

 
Top