तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील नरसिंह नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव  निमित्ताने व देवीच्या मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे .

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सव निमित्ताने तेर ता .धाराशिव येथील नरसिंह नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून अखंडपणे देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून तिची मनोभावे पूजा करण्याचे पुण्यकर्म नरसिंह नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे विशेष म्हणजे दरवर्षी नवरात्र उत्सवाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कृपा आशिर्वादाने पावन झालेल्या श्री तुळजापूर येथून पायी चालत ज्योत आणुन केली जाते या ज्योतीची स्थापना देवीच्या मंडपात करण्यात येते या नऊ दिवसांमध्ये देवीच्या समोर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देवीची मंच की मुद्रा कोजेगिरी पौर्णिमे समाप्त होऊन देवीच्या मूर्ती गावातून मिरवणूक काढण्यापेक्षा मिरवणुकीवरील अनावश्यक खर्च टाळून भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे यंदा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ६७ देवी भक्तांनी रक्तदान केले होते दरम्यान शारदीय नवरात्रौत्सव निमित्ताने मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध धार्मिक व  समाजपयोगी उपक्रमाचे भाविक भक्तांसह नागरिकांतून  कौतुक करण्यात आले .दरम्यान नवरात्र उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुजीत इंगळे, अमित कोळपे, मनोज साखरे , सचिन कोळपे , सूरज शिराळ, अविनाश इंगळे,  गोपाळ इंगळे, नागेश पांगारकर, गोविंद इंगळे, धीरज पांगारकर, अमोल पांगारकर, रणजीत इंगळे , अक्षय कोळपे, बाबासाहेब इंगळे, विश्वनाथ इंगळे, अमोल उडगे , महादेव झाडे, बजरंग गाढवे, महेश उडगे, दत्ता देशमाने , बालाजी इंगळे,  संतोष इंगळे, हनुमंत गाढवे , शिवाजी पांगरकर आदिंसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top