धाराशिव (प्रतिनिधी)- माजलगाव बीड येथील सोनार समाजातील एका चिमुकलीवर झालेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर कार्यवाही करण्याची धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशन च्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

माजलगाव येथे सोनार समाजातील एका लहान चिमुकल्या मुलींवर शाळेतला नराधम शिक्षकांनी अमानुषपणे अत्याचार केला हि बाब निंदनीय आहे. याचा धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशन च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी अशी मागणी धाराशिव जिल्हा सराफ व सुवर्णकार बांधवांच्या वतीने करण्यात आली . अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा धाराशिव जिल्हा सराफ सुर्णकार यांनी दिला आहे यावेळी उपस्थित.

धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशन चे जिल्हा अध्यक्ष  दत्ता माळी, जिल्हा कार्यध्यक्ष , कृष्णा डहाळे, जिल्हा सचिव मयूर जालणेकर, कोषध्यक्ष सचिदानंद पोतदार, जिल्हा संघटक राजेश कदम, तानाजी मुंढे , श्रीकृष्णा नाईकनवरे वैभव बोन्दरे , संतोष  विलास थडवे, रघुवीर चित्राव बाप्पा योगेश शहाणे ,विकास टेहरे, उमेश बांगर, प्रतिराज महामुनी राम तळणकर, नागेश शहाणे, राजू पंडित भागवत थडवे, बालाजी डहाळे, विरभद्र हांडेकर, पिंटू मालेगावकर श्रीनिवास शहाणे, राजू कारागीर आबा वेदपाठक ,आकाश फिसरेकर, प्रविण जरे संदीप टोणपे, बालाजी इंगळे, महादेव हांडेकर, व बहुसंख्येने सराफ व सुवर्णकार बांधव उपस्थित होते.

 
Top