तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील स्वयंम शिक्षण संस्थेच्या संवाद सहाय्यक जयश्री माळी यांनी राजस्थान राज्यातील जयपूर येथे स्वच्छ  उर्जा प्रचार,प्रसार आणि पूढील दिशा ठरविण्यासाठी सारेच व  यूएसऐआयडी अर्थ सहीत उपक्रम अंतर्गत सासेफ यांनी आयोजित केलेल्या अंतरराष्ट्रीय पातळीवर  कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन केले..

राजस्थान राज्यातील जयपूर येथे “यूएसऐआयडी आयोजित स्वच्छ उर्जा प्रचार, प्रसार आणि पूढील दिशा ठरविण्यासाठी आशिया खंडातील भारत,भूतान, बांगलादेश, श्रीलंका,नेपाळ,मालदीव, फिलीपिन्स या देशातील मंत्री, सचिव, अधिकारी, स्वच्छ उर्जावर काम करणाऱ्या कंपन्या व संस्था या सहभागी झालेल्या होत्या.या कार्यक्रम प्रसंगी शीस्तीमा बायोगॅस  संदर्भात  मार्गदर्शन करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील तेर येथील स्वयंम शिक्षण संस्थेच्या संवाद सहाय्यक जयश्री गोरख माळी यांची निवड करण्यात आली होती.जयश्री माळी यांनी बायोगॅस संयंत्र तयार करण्यापासून ते कशा प्रकारे वापरावे व त्याचा फायदा काय यासंदर्भात उपस्थित मान्यवरांना स्वयंम शिक्षण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक तब्बसूम मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन केले.


 
Top