परंडा (प्रतिनिधी) - पाणी व वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे ते सर्वांनी करावे असे प्रतिपादन ग्रीन क्लबचे जिल्हा मास्टर ट्रेनर डॉ. सचिन चव्हाण यांनी येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग्रीन क्लब कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयामध्ये विद्यापीठ व युनिसेफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रीन क्लबच्या अंतर्गत वृक्षारोपण, पाणी संवर्धन, पोस्ट सादरीकरण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. विशाल जाधव यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने उपस्थित होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून ग्रीन क्लबचे जिल्हा मास्टर ट्रेनर डॉ. सचिन चव्हाण हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार  माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रमुख व्याख्याते डॉ. सचिन चव्हाण, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संभाजी गाते व ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ विशाल जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विशाल जाधव यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अमर गोरे पाटील यांनी मानले.

 
Top