परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील मौजे आरणगाव येथे इंण्डसईडं बँक यांच्या सामाजिक दायित्व अंतर्गत संपदा ट्रस्ट यांच्या वतीने सोमवार दि.30 स्पटेंबर पासून चार दिवशीय मोफत शेळीपालन प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात आली आहे.

आरणंगाव येथे ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू महिलांना मोफत शेळीपालन प्रशिक्षण देऊन संपदा ट्रस्ट च्या माध्यमातुन उपस्थित महिलांना उद्योग व्यवसायाच्या संधी व त्यांचे  ट्रेनिंग सेंटर याची विस्तृत महिती संपदा ट्रस्ट चे सुजित जगताप यांनी दिली. तसेच विविध उद्योग असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व शासकीय योजनातील पशुसंवर्धन विभाग अंतर्गत शेळीपालन लाभ हा 50%  मोफत सबसिडीवर राबवला जातो याची सविस्तर महिती लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी दिली. याबरोबरच सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व युवतींनी नोकरीच्या मागे न लागता शेतीपुरक उद्योग व्यवसाय याकडे भर दिला गेला पाहिजे व त्यातून आपला शाश्वत विकास करुन घेतला पाहिजे अशी आशा बाळगायला महिलांना माहिती घेऊन प्रोत्साहित केले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक लघुउद्योग सल्लागार गणेशद नेटके, भुम परंडा समन्वयक सुजित जगताप, प्रेरिका एन कापुरे आदीसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने प्रशिक्षणास उपस्थित होते.

 
Top